नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट केला; भाजप आमदाराचा सनसनाटी आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईत आणि शिवसेना भवना बाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांनाच वाचवायला पुढे आलेत असा सनसनाटी आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांच्या या आरोपानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या नवाब मलिका यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे उद्या एमआयएम जरी यांच्यासोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही नाही,” असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे हिंदुत्व हे फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापुरतंच राहिलेलं आहे. ज्या दिवशी काँग्रेससोबत सत्तेत बसले, त्या दिवशी हिंदुत्वाला लाथ मारलेली आहे. एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जात असून योजना दिल्या जात आहेत. ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले ते हिंदुत्व मात्र पक्षप्रमुख विसरले आहेत,” अशी टीका श्वेता महाले यांनी केली आहे.