पूरग्रस्तांसाठी भाजप आमदार देणार एक महिन्याचे मानधन – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आमदारांनीही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे “भाजपा आमदारांचे एक महिन्याचे एक महिण्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी, मुख्यमंत्री सहायता निधीला देयाचा निर्णय घेतला आहे,”अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली.

सध्या राज्यात अस्मानी संकट ओढवलेलं आहे. महापूर, दरडी कोसळण्याच्या घटनेत अनेक लोकांची कुटूंब उद्धवस्थ झाली तर अनेक जणांना जीवही गमवावे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी भयानक घटना घडल्या आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीमध्ये राज्य संकटात असताना सर्वजण राजकारण विसरुन आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजपनेही आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांचा एक महिण्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

आमदार शेलार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे कि, भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक झाली आहे. त्यामध्ये भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.