शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट का वाटतं ? ; साध्वी प्रज्ञा यांच वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur ) नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता “ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट का वाटतं, हे समजत नाही,” असा प्रश्न प्रज्ञा ठाकूर यांनी केला. मात्र, त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटलं आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी या कार्यक्रमात बोलताना जाती व्यवस्थेचे समर्थन केले. प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले

राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार, असा सवाल साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थित केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment