भाजप वेबसाईटवरील आक्षेपार्ह्य उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रथमच प्रतिक्रिया, म्हणाल्या..

मुक्ताईनगर । रावेर मतदारसंघाच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह्य उल्लेख करण्यात आला आहे. या घृणास्पद प्रकाराची राज्यभर निंदा केली जात आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे. यानंतर रक्षा खडसे यांनी या प्रकरणावर प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

”घडलेला प्रकार हा अत्यंत वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती,” अशी नाराजी रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. एका महिला म्हणून, एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटलं, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.

तसेच प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले. भाजपाकडून हे करण्यात आलेलं नाही. माझ्याकडे जे मेसेज आले आहे. त्यामध्ये ‘सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी’ या पेजवरून याचे स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहे. हे पेज कोण चालवत आहे, ते माहिती नाही. या पेजवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली, असा आरोपही रक्षा खडसे यांनी यावेळी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like