भाजप खासदाराला राहुल गांधींची काळजी! लोकसभेत केली कोरोना टेस्ट करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात फिरायला आलेल्या इटलीच्या १२ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न होताच आज लोकसभेत सुद्धा हा कोरोनाचा मुद्दा चर्चिला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार रमेश बिधूरी थेट कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली. खासदार बिधूरी यांनी इटलीच्या पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत लोकसभेत राहुल यांची तपासणी करण्याची मागणी केली.

रमेश बिधूरी म्हणाले, ”राहुल गांधी यांनी सहा दिवसांपूर्वी इटलीहून परतले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण तर झाली नाही हे तपासण्यासाठी त्यांनी त्यांची टेस्ट करावी. अशी मागणी बिधूरी यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. ”खासदार सर्वांशी भेटता असतात, त्यामुळे राहुल गांधींसोबत उठबस करणाऱ्या खासदारांमध्ये कोरोना पसरू शकतो. इटलीमधील बरेच लोक कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणून राहुल यांनी आपली कोरोना टेस्ट करून, त्याचा निकाल संसदेला सांगायला हवा.” भाजप खासदार बिधूरी यांच्या लोकसभेतील मागणीवरून राहुल गांधी यांना लक्ष केल्यानंतर कोरोना व्हायरसमुळे भारतातील राजकारण सुद्धा तापायला लागाल आहे.

दरम्यान ,कोरोना व्हायरस भारतातही पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्त 29 प्रकरणे आढळली आहेत. भारताव्यतिरिक्त जगातील बर्‍याच देशांमध्ये हळूहळू कोरोनाचा व्हायरस पसरत आहे. भारतातील ताजी घटना गुरुग्राममधील असून, पेटीएमच्या एका कर्मचाऱ्याला तपासणीत कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment