हेमंत करकरेंना मी देशभक्त मानत नाही; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी आमचे आचार्य ज्यांनी आम्हाला इयत्ता आठवीपर्यंतचं शिक्षण दिलं होतं. त्यांची बोटं करकरे यांनी छाटली होती त्यामुळे हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.

ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिलं त्या शिक्षकाची बोटं करकरे यांनी छाटली होती. जे लोक हेमंत करकरे यांना देशभक्त संबोधतात अशा हेमंत करकरेने लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकांची बोटं छाटण्याचं काम केलं होतं. हे कुणासाठी केलं होतं? आणि ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?”, असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1408456694925959169?s=20

देशात एक आणिबाणी 1975 साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही 2008 साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. दरम्यान, आपल्या शापामुळेच हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं होतं.

Leave a Comment