व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री उशिरा व्हॉट्सअॅप कॉल केला. आपण इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे सांगून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सांगितले की, तुला लवकरच मारले जाईल. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तो कॉल रेकॉर्डिंग केला.

त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. खासदार झाल्यापासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अनोळखी नंबरवरून अनेक धमकीचे मेसेज आणि कॉल आले आहेत.

साध्वीने केलं होतं नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. या प्रकरणात त्यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हटले होते.