हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य प्रदेशमधील खासदार आणि पूर्व मंत्री पी. सी शर्मा यांनी धोनीला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली होती. धोनीने भारताला बरेच यश मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा, तो या पुरस्काराचा हकदार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.
धोनीच्या निवृत्तीनंतर शर्मा यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” संपूर्ण जगामध्ये भारतीय क्रिकेटला विजेता ठरवणारा महेंद्रसिंग धोनी हा देशाचे एक रत्नच आहे. त्यामुळे त्याला भारतरत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. धोनीने क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. हा सन्मान देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. त्यामुळे धोनी या पुरस्काराच्या लायक नक्कीच आहे.”
धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 2013 भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. तसेच धोनीच्या काळातच भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत नंबर 1 च सिंहासन भेटलं होत.. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी आहे.