भाजपचे खासदार संजय काका राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या गाडीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्याताली घारेवाडी येथे वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. या निमित्ताने जयंत पाटील हे हवाई मार्गे कराड विमानतळावर दाखल झाले, तेव्हा सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील हे उपस्थित होते. केवळ उपस्थिती नव्हे तर जयंत पाटील यांच्या गाडीत बसून संजय काका रवानाही झाले. त्यामुळे राजकीय चर्चांनी उधाण घेतले, तर या प्रवासात नक्की गुफ्त राजकीय चर्चा काय झाली हे समोर येवू शकले नाही.

कराड येथील विमानतळावरून एकाच वाहनातून दोघेही तात्काळ रवाना झाले. सध्या राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाची राजकीय समीकरणे काही वेगळ्या मार्गाने चालली आहेत की, सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील बदलांची समीकरणे कराडच्या यशवंत भूमीत रंगली हे येत्या काही दिवसात समजेल. मात्र, दोन्ही महत्वाच्या नेत्यांची थेट- भेट झाल्याने सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

या भेटीवेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी नगरसेवक साैरभ पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, पांडुरंग चव्हाण, लालासाहेब पाटील, माजी नगरसेवक गंगाधर जाधव आदी उपस्थित होते. या भेटीने व फोटो व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांनी चांगलेच उधाण घेतले आहे. कराड विमानतळ ते घारेवाडी या 15 किलोमीटर अंतरात नक्की काय चर्चा झाली यांचा तपशील मात्र समजू शकला नाही.