हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फुल फॉर्म सांगितला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार असलेल्या सुशीलकुमार मोदी यांनी यावेळी संसदेत भाषण करताना विरोधकांना टोला देखील लगावला.
सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. सुशील मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, परंतु आयुष्य गेलं तर पुन्हा परत आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वात म्हटलंय की, ‘आपदाग्रस्त जीव प्राण रक्षा ही धर्म है’ केंद्र सरकार याच गोष्टीचं पालन करते, कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असं ते म्हणाले.
सुशील कुमार मोदी पुढे म्हणाले, लोकं जन धन खात्यांची खिल्ली उडवतात, पण जन धन खातं नसतं तर करोना काळात गरीबांपर्यंत पैसा कसा पोहोचला असता असा सवालही त्यांनी विचारला . नंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावातील प्रत्येक अक्षराचा फुलफॉर्म सांगितला. पाहूया सुशील मोदींनी काय फुलफॉर्म सांगितला
N- New india
A- Aatm nirbhar bharat
R- Ready for reforms
E- Electronic agri market
N- New Financial Structure
D- Disinvestment
R- Railway and roads
A- Agriculture Reforms
M- MSP assured, Helping migrant worker
O- One person company
D- Down to earth
I- Inclusive development
अमेरिकेत योजनांचा थेट फायदा होत नव्हता, ८ कोटी लोकांचे चेक प्रिंट केले, त्यानंतर ट्रम्प यांनी सही केली आणि पुढील ४ महिनेही त्या चेकचं वाटप करता आलं नाही. तर दुसरीकडे भारतातील लोकांना लाभ थेट त्यांच्या जनधन खात्यात वेळोवेळी मिळत होता. त्याशिवाय लॉकडाऊन काळात मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक सुशील मोदींनी राज्यसभेत केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’