खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला ?? ; चर्चांना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही भेट होणार आहे.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उदयनराजे आणि शरद पवारांची ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like