दिल्लीत उदयनराजे आणि नाना पटोले आले समोरासमोर आणि..

नवी दिल्ली । काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे आज दिल्लीत अचानक समोरासमोर आले. 10 जनपथजवळ या दोघांची अचानक भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या.

या भेटीत दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. भिन्न पक्षाचे असून सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला साजेसा व्यवहार दोघांमध्ये यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, नाना पटोले आणि काँग्रेस नेते नितीन राऊत एकाच वेळी सोनिया गांधींच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नितीन राऊत यांचं महत्व कमी न करता खाते बदल होण्याची शक्यता आहे. नितीन राऊत यांच्याकडे असलेलं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीत नाना पटोले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती नाना पटोलेंनी दिलीय. सदर वृत्त टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीच्या हवल्याने दिलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like