सावंतवाडीचा आमदार शेंबडा; राणेंचा केसरकरांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधताना त्यांचा शेंबडा आमदार असा उल्लेख केला आहे. नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली.

सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी दीपक केसरकरांवर केली आहे. एक साधा प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं नाही. चष्मा नाकावर आलेला पडायचा बाकी होता, असा विधानभवनातील प्रसंग नारायण राणेंनी भर सभेत सांगत दीपक केसरकरांवर टीका केली आहे.

तुमचं सिंहासन हलवलं म्हणून टीका करता- केसरकर

नारायण राणेंच सिंहासन मी हलवलं याची कायम सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात असा पलटवार केसरकर यांनी केला. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालत नाही. ते नुसतं बोलतात. कामं करत नाहीत. मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे असेही ते म्हणाले.