मोठी बातमी | भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत अनेकांच्या घरात कोरोनाने शिरकाव केलाय. त्यातच आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.

‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन’

यापूर्वी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी लगेचच कोरोनावर मात केली होती. दरम्यान, राज्यात बुधवारी रात्रीपर्यंत 19,163 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर 18,317 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात बुधवारी रात्रीपर्यंत 10,88,322 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप  2,59,033 रुग्ण उपचाराधीन आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like