आता कुठे मुख्यमंत्र्यांचा घरातून डिस्चार्ज झालाय; राणेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आता कुठे घरातून डिस्चार्ज झालाय.. आता फिरत आहेत असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी पत्रकारांनी केला असता त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून ..आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

दरम्यान, या लोकांचं पुर्णपणे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यांना चागंली पक्की घरं देण्याची योजना राबवली जाईल. राज्य सरकार व केंद्र सरकार दोघेही मिळून परत ही वसाहत चांगल्याप्रकारे बांधतील.इथली शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस विभाग अतिशय़ चांगलं काम करत आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमधून जे लोक वाचलेली आहेत, त्यांना आधार किंवा चांगल्याप्रकारे सांभाळण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू..” असं देखील नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment