कोण अजित पवार ?? मी ओळखत नाही; राणेंचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. कोण अजित पवार ?? मी त्यांना ओळखत नाही असे म्हणत नारायण राणे यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच नितेश राणे विधिमंडळात चांगलं काम करतो याचीच सरकारला पोटदुखी आहे आणि म्हणून त्याला अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला

राज्यात ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराचं आरोप आहे त्यांच्यावर काय बोलायचं. कोकणात पूर, वादळ आणि अतिवृष्टी आली तेव्हा अजित पवार आले नाहीत मात्र ज्याने मार खाल्ला त्याचा सत्कार करायला मात्र अजित पवार आले असेही नारायण राणे यांनी म्हंटल

यावेळी त्यांनी नितेश राणेंच्या म्याव म्याव आवाजावरून देखील स्पष्टीकरण दिले,आदित्य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध, आदित्य ठाकरे यांचा आवाज मांजर सारखा नाही, आणि मांजराचा आवाज काढल्यावर राग का यावा असा सवाल नारायण राणे यांनी केला

नितेश राणे आम्हाला समोर का दिसत नाही असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला होता त्याचाही राणेंनी समाचार घेतला. कोण सुनील प्रभू ? त्याची काय औकात असे म्हणत हिंमत असेल तर समोर येऊन बोल असा इशारा नारायण राणे यांनी दिला. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख आणि संजय राठोड कुठे गायब होते असा सवाल करत सुनील प्रभुनी इतिहास जाणून घ्यावा असे नारायण राणे यांनी म्हंटल