पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र ; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 12 डिसेंबर रोजी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भावनिक पत्र लिहले आहे. भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. दरवर्षी 12 डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो संकल्प तुम्ही पूर्ण करणार का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केला आहे. त्यांनी आपले हे पत्र ट्विट देखील केले आहे.

पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हंटले आहे की, “दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले आहे. 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही.”

 

“गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी 12 डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे जोपर्यंत ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने निवडणुकांना स्थगिती द्यावी. विशेष अधिवेशन घेऊन आधी ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.