Saturday, January 28, 2023

‘तो’ खान आहे म्हणून नवाब मलिक यांची आदळआपट सुरू; नितेश राणेंची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली. तसेच त्यांनी एनसीबी वर गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो खान आहे, सुशांत सिंह राजपूत नाही. तसेच खान नाव असल्यामुळे तो पीडित आहे का आणि सुशांत हिंदू होता, त्यामुळे तो ड्रग्ज अॅडिक्ट झाला का?’, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरून केला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. मात्र भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केला. दिल्लीपासून महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी त्यांना सोडण्यासाठी फोन केले आणि त्यामुळे एनसीबीने त्यांना सोडलं आहे, असं म्हणत ही छापेमारी पूर्णपणे बोगस आहे अस नवाब मलिक यांनी म्हंटल.