ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही त्याला आमदार केल्यावर ..; राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा फटका संपूर्ण राज्याला बसला. या चक्रीवादळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील ४५ वर्षीय महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घटना घडली. मात्र घटनेच्या ३ दिवसांनंतरही वरळीच्या आमदार किंवा भागातील नगरसेवक कोणीही मृत महिलेच्या कुटुंबीयांकडे अद्यापपर्यंत फिरकलेच नाहीत. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी प्रतिक्रिया देत वरळी विधानसभा आमदार आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला तरी शिव्या घालतायत. म्हणून मतदान करताना विचार केला पाहिजे नाही तर असा मनस्ताप होतो’. असं ट्विट करत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यापूर्वी देखील निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. एक व्हिडिओ ट्विट करत राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला होता. ‘हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment