उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले; राणेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं पण पुत्रकर्तव्य म्हणून मी आज खुर्चीवर आहे असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिले होते. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत उद्धव ठाकरेंवर कडक शब्दांत टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका . उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले.अशा शब्दांत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले –

मुख्यमंत्र्यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली होती. “माझं कधीही स्वप्न नव्हतं. शेवटी एक पुत्रकर्तव्य असतं. मी माझ्या वडिलांना हातात हात घालून वचन दिलं होतं. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवणार. पण हे मी का म्हटलं त्यांना? कारण त्यांचा वारसा पेलण्याची जबाबदारी मी समर्थपणे घेतली आहे. नाही तर माझ्या आयुष्याचा उपयोग काय? मी घेतली ही जबाबदारी. त्यातून मी पुढे गेलो. माझ्यासाठी नाही काही केलं. मला मुख्यमंत्रिपदाची अजिबात अभिलाषा नव्हती”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment