अजित पवार स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही ; निलेश राणेंचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही, असं म्हणत हल्लाबोल केला. आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार 1 वर्षभर शांत का बसले होते, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला

निलेश राणे म्हणाले, “अजित पवार यांची स्वतःची ताकद काहीही नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांची आहे. शरद पवार यांनी बारामतीत ताकद निर्माण केली आणि टिकवली. अजूनही शरद पवार यांचं तिथं लहानलहान गोष्टींवर लक्ष असतं, त्यांचा पहारा असतो. अजित पवार यांनी त्यातील काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी निवडून देतो असं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात अजित पवारांमुळे निवडून आला असा एकही आमदार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मोठमोठ्या बाता करु नये.”

भ्रष्टाचाराचे आरोप आणि वेगवेगळी वक्तव्ये यावरच ते चर्चेत असतात. ते समाजोपयोगी कामासाठी चर्चेत नसतात. त्यांना स्वतःच्या पक्षातील आमदार न टिकवता आल्याने तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आजही आठवतात,” असंही राणेनी नमूद केलं.

“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही,” अशी टीका निलेश राणेंनी केली.

नक्की काय म्हणाले होते अजित पवार

जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment