राज्याला परिवहनमंत्री हवा, अनिल परब हे तर परिवारमंत्री ; राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वर निशाणा साधला.

ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला.

आमच्या आमदारांना धमकीचे फोन येतात. त्याची चौकशी होत नाही. चित्रा वाघ यांच्या वाहनामागे एक वाहन पाळतीवर असते. आता कुणी धमक्या दिल्यानंतर कारवाई होत नसेल. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर आमच्यावर केस करायच्या नाहीत. काही बोललं की जुन्या केस उकरून काढल्या जाता. अशी केस आहे तशी केस आहे सांगितलं जातं. पण जूनं बोलायचं तर आमच्याकडे खूप आहे. तुमच्यासोबत ३९ वर्षे काढली आहेत. पण आम्हालाही बाळासाहेबांची शिकवण माहिती आहे, अंगावर आले तर शिंगावर घ्या. त्यामुळे जुन्या गोष्टींची आठव थांबावायचा प्रयत्न केला तर मग सोनू निगम पण निघेल आणि आणखी काही निघेल, हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही नीतेश राणेंनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like