आजोबांनी चिअरलीडर्स नाचवल्या, आता नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय; निलेश राणेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कोविड सेंटरमधील डान्स व्हिडिओ नंतर भाजप कडून रोहित पवारांना लक्ष केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर टीका करताना शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

भातखळकरांनी देखील साधला निशाणा –

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही रोहित पवारांवर निशाणा साधला.कोविड रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही आणि कोविड सेंटरमध्ये रोहित पवार यांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment