आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला, तुमच्या पोटात का दुखतं? ; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर देशभरातील भाजप विरोधी नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. . या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली होती. ‘आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ आहेत, असा टोला राऊतांनी लगावला होता.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेत आहेत, ते मोठेच नेते आहेत. पण, संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केलीय. पण, आक्षेप कोणाचा आहे? स्टेडियलमा मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का, असा सवाल राणेंनी विचारला.

तसेच, सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव होते. मग, सुब्रोतो राय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का? असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळे, हे असले विषय काढून विषय वळविण्याचा हा प्रयत्न असल्याच टीका निलेश राणे यांनी केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment