शिवसेनेचा इतर राज्यात 1 नगरसेवक देखील कधी निवडून आला नाही ; निलेश राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूक सध्या जोरदार चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान शिवसेनेने मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीतुन माघार घेत अडचणीत असलेल्या ममता बॅनर्जी याना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले.

‘जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगाल मध्ये निवडणुक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण सोधलय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं’. असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे.

शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. त्यातून धडा घेत त्यांनी बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतल्याचा टोला राम कदम यांनी लगावला. तसेच शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल अशी घणाघाती टीका राम कदम यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like