पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे.

देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांवर केंद्र सरकारनं दबाव आणला. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like