सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली; नव्या दाव्याने खळबळ

ravikumar gowda
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या शेजारील राज्य कर्नाटकातून (Karnataka Government) एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटक मध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून सिद्धरमैया हे मुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपकडून कर्नाटकात ऑपरेशन लोटसचा (Operation Lotus) प्रयत्न सुरु आहे आणि सरकार पाडण्यासाठी आपल्याला १०० कोटींची ऑफर देण्यात आली आहे असा दावा मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा (Ravikumar gowda) यांनी केलं आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे असून योग्यवेळी ते बाहेर काढेन असा इशाराही गौडा यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

रविकुमार गौडा (Ravikumar gowda) म्हणाले, राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे. मात्र भाजपने आता ५० कोटी रुपयांची ऑफर १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. परवा कोणीतरी फोन करून १०० कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. परंतु मी त्यांना नकार दिला. त्यांना 50 आमदार विकत घ्यायचे आहेत. भाजपचे लोक 50 कोटींवरून 100 कोटींवर पोहोचले आहेत, ते रोज आमचे सरकार पाडण्याचे ठरवत आहेत, पण आमचे सरकार स्थिर आहे. मुख्यमंत्रीही कणखर आहेत. मला ज्या कोणी फोन केला होता त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू, आम्ही पुरावे गोळा करत आहोत, आम्ही ते ईडी (ED), सीबीआयला (CBI) देऊ, आम्हाला त्यांना रोख रकमेसह पकडायचे आहे असंही रविकुमार गौडा यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही गौडा यांनी केला होता आरोप –

ऑपरेशन लोटसबाबत गौडा यांनी केलेला आरोप हा काय नवीन नाही, यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा आरोप भाजपवर केला होता एका टीमने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्री पदाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी चार आमदारांसोबत संपर्क साधला होता आणि त्याचे आमच्याकडे पुरावेदेखील आहेत असं म्हणत गौडा यांनी काही दिवसांपूर्वी खळबळ उडवली होती. रविकुमार गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एच डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.