तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटर वार जोरदार रंगात आले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही असा आरोप पंकजा यांनी केला.

राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

नक्की काय आहे प्रकरण –

पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे याना पत्र लिहिलं होतं. REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. असे पंकजा यांनी म्हंटल होत.

धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले होते-

ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like