भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही; पंकजा मुंडेंची सरकारवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. . “५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांखालचं आरक्षणही सरकारनं गमावलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकार निशाणा साधला.

इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल. त्यामुळे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही असा आरोप करत आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही असेही पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा सांगितले.

अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं.