मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आता मराठा आरक्षणावरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात काही मराठा तरूण आंदोलन करताना दिसले. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही होताना दिसली. यासोबतच त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या. अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिला

दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment