जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीका दरेकरांनी केली

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं. मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाही. लसीकरणाच्या संदर्भात टाईम बाऊंड असे काहीही भाष्य केले नाही. कोरोनामुक्त गाव, जिल्हा आणि राज्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला.

मराठा-ओबीसी आरक्षणावरही पण बोलण टाळले. एका ठिकाणी कोविड रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटवत आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन वाढवत आहात. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे बोलून जबाबदारी झटकायची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.