यांचं म्हणजे ना..नाचता येईना अंगण वाकडं; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि मुंबईकरांची धावपळ होते. यंदाही असच झाल्यानंतर भाजप कडून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राहुल शेवाळे यांनी मुंबईची तुंबई होण्याला केंद्र सरकारला जबाबदार धरल्यानंतर प्रविण दरेकरांनी त्यावर टोला लगावला आहे. “यांचं म्हणजे ना… नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना ओली लाकडं! स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!”, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवरून खोचक टीका केली आहे.

राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले होते –

केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात आहे. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचते असा आरोप शेवाळे यांनी केला होता.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल देखील ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे काही काळ बंद ठेवावी लागल्यामुळे यावर मुंबईकरांची तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment