मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली; भाजपचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे असा टोला शिवसेनेने मोदी सरकारला लगावला होता. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली असे दरेकर म्हणाले.

अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही  किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8% पर्यंत ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. असेही दरेकर यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment