शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला विसरलेले राऊत, राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानाने करतायत – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत हे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखी वक्तव्य करत आहेत. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, बंजारा समाज त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं केलं. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्य आहे, त्या विषयी दुमत असण्याची काहीच कारण नाही. परंतु त्यावेळेला चौकशीसाठी राजीनामा आवश्यक वाटला, म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षचा नेता, त्याचा राजीनामा घेतला जातो तेव्हा संजय राऊत याचं वक्तव्य येत नाही, की चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून, मग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? की कशासाठी माहिती नाही.

परंतु त्याचवेळेला शिवसेनेच्या कार्यकर्त्याची, नेत्याची पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची भलामन पाठराखण अत्यंत इमानदारीने करताना दिसतात. म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसतात.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like