Friday, January 27, 2023

बंडातात्यांना अटक म्हणजे सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान; दरेकरांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. बंडातात्यांना केलेली अटक म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.

कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

50 च्या संख्येने वारीला पायी चालत असताना परवानगी सरकार देत नाही. मग त्याठिकाणी सविनय पध्दतीने बंडातात्या कराडकर आंदोलन करत असतील तर मग अशा पध्दतीने त्यांना जेरबंद करणे, मुस्कटदाबी करणे हे महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे असे म्हणत हे सरकार आता वारकऱ्यांना पण सोडत नाही आणि याकरिता त्यांना प्रचंड किंमत मोजावी लागेल . वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने वारकरी संतप्त झाले असून आता सरकारला वारकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेही दरेकरांनी म्हंटल.