Wednesday, October 5, 2022

Buy now

मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चावेळी देवेंद्र फडणवीसांना घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सभेनंतर फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मोर्चाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांना पोलीस सटेशनमध्ये आणल्यानंतर बसवून ठेण्यात आले. व त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोटचाला मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. उया मोर्चाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधीकारी उपस्थित होते.

यावेळी मोर्च्यातील सभेत मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर आझाद मैदानावरून भव्य असा मोर्चाचे काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.

भाजपाकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावेळी दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ही मागणी फेटाळून लावली आहे.