सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ले करून त्याचे खून केले जात आहेत. तेथील सत्तेत असेलेले तृणमूल काॅंग्रेस तेथे हिंसाचार करत आहे, येणारा काळ भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी कठीण असणार आहे. तृणमूल काॅंग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये मुघलशाही सुरू आहे. देशातील सर्व भाजपा कार्यकर्ता पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर असून टीएमसी सरकारचा निषेध करत असल्याचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला आहे.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ममता बॅंनर्जी व त्याच्या टीएमसी सरकारचा निषेध करण्यात आला. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यानी आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. यावेळी कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्त्यानी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोनाचे नियम पाळून निदर्शने केली.
सातारा भाजपाची केंद्रापर्यंत भावना कळविण्याची विनंती
सातारा येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील हल्लेखोर आणि अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आमच्या भावना केंद्रातील सरकारला कळावाव्यात, अशी मागणी केंद्रातील भाजपा सरकारला सातारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba
Click Here to Join Our WhatsApp Group