जय श्रीराम म्हणायला लाज वाटणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा ; राम कदमांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. त्यातून धडा घेत त्यांनी बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतल्याचा टोला राम कदम यांनी लगावला. तसेच शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल अशी घणाघाती टीका राम कदम यांनी केली.

संजय राऊतांनी जाहीर केली होती शिवसेनेची भूमिका

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like