…मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ; सरकारच्या निर्णयावरून राम कदम आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर ठाकरे सरकारकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला असून आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

राम कदम यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई के ली जाईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like