भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती रखासदार रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या.

दरम्यान, रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

Leave a Comment