भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. प्रचाराचे शेवटचे काही दिवस आता उरले असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शरसंधान करताना दिसत आहेत. मात्र याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या काळात केलेली प्रगती सांगण्यावर भर दिल्याचे दिसत आहे.

आज अमरावती मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ५ वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी विदर्भावर सरकारने दाखवलेल्या मर्जीचा सुद्धा दाखला दिला.सरकारने विकासाचे इंजिन आणले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment