नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम; सदाभाऊंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम आहेत आणि गुलामाच्या बोलण्यास फारसे महत्व दिले जात नाही. अशा शब्दांत भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती त्याला उत्तर देताना खोत यांनी मालिकांचा चांगलाच समाचार घेतला.

मराठा आरक्षणावर मलिक सतत काही न काही बोलत असतात. पण मलिक यांना एक प्रश्न विचारायचा आहे, राज्यात पंधरा वर्षे तुमचे सरकार होते. त्यावेळी तुम्ही काय शेनी लावायला रानात गेला होता का ?. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

मराठा समाजामध्ये दुही निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर मराठा समाज हा लढवय्या आहे. जी गोष्ट त्याला मिळत नाही. ती तो हक्काने, लढाई करून प्राप्त घेतो. त्यामुळे तुमच्यासारख्या गुलामाने मराठा समाजाला शहाणपणा शिकावण्याच काम करू नये असेही सदाभाऊ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment