Sunday, February 5, 2023

पंढरपूर निवडणूक : राष्ट्रवादीला धक्का!! भाजपचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत निवडणूकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे हे आघाडीवर दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीत जोर लावला असताना देखील भगीरथ भालके अजूनही पिछाडीवर आहेत.

दरम्यान हाती आलेल्या कलानुसार 23 व्या फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर असून भगीरथ भालके यांच्यासाठी ही आघाडी तुटण जरा अवघड वाटत आहे. सुरुवाती पासून च समाधान आवताडे यांनी भालके यांच्यावर आघाडी घेतली असून अजूनही ती कायम आहे

- Advertisement -

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

हे पण वाचा –