उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट, ते स्वतःच आघाडीतून बाहेर पडतील; भाजप नेत्याचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घुसमट होत असून आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, अस मोठं विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काकडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील.

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like