मोदी जोमात कार्यकर्ते जोरात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मोदींनी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधल्या नंतर बूथ कार्यकर्त्यांनी विजय संकल्प रॅलीचं आयोजन
करण्यात आलं होतं.  भारतीय जनता पक्षाच्या संघटन शक्तीचे विराटदर्शन घडविण्यासाठी पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघामध्ये पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा विजय संकल्प दुचाकी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरवात औदुंबर येथून झाली आणि कडेगाव येथे रॅलीची सांगता झाली. या रॅली मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पलूस-कडेगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देशभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने दुचाकी महारॅलीचे आयोजन केले आहे. पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघातही भाजपा विजय संकल्प दुचाकी महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या महारॅलीमध्ये शेकडो दुचाकी धारकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री तीर्थक्षेत्र औदुंबर येथून या महारॅलीस सुरुवात झाली. औदुंबर, अंकलखोप, आमणापूर मार्गे पलूस ते कडेगाव असा रॅलीचा मार्ग होता. या विजय संकल्प महारॅलीमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला.

रॅलीच्या माध्यमातुन आगामी निवडणुकांसाठी पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आहे, पक्षाच्या आदेशानेच कार्य आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये मोठी फळी आहे.लोकसभा निवडणूक असुदे किंव्हा विधानसभा निवडणूक असुदे भाजपमध्ये उमेदवार निवडण्याची एक कार्ययपद्धती आहे. त्या पद्धतीनुसारच जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. यावेळी सुरेंद्र वाळवेकर, नितिन नवले, विजयकुमार चोपडे, रमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment