भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजितदादा- शिंदेंसह ‘या’ नेत्यांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigners) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे. तब्बल ४० जणांची यादी करत भाजपने निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे असं म्हणावं लागेल.

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाकोणाची समावेश ?

1- जगत प्रकाश नड्डा
2- नरेंद्र मोदी
3- अमित शाह
4- राजनाथ सिंह
5- योगी आदित्यनाथ
6- नितिन गड़करी
7- भूपेन्द्रभाई पटेल
8- प्रमोद सावंत
9- डॉ. मोहन यादव
10- विष्णु देव साई
11- भजन लाल शर्मा
12- एकनाथ शिंदे
13- रामदास आठवले
14- अजित पवार
15- नारायण राणे
16- अनुराग ठाकुर
17- ज्योदिरादित्य सिन्धिया
18- स्मृति ईरानी
19- रावसाहेब दानवे पाटिल
20- शिवराज सिंह चौहान
21- देवेन्द्र फडणवीस
22- सम्राट चौधरी
23- अशोक चव्हाण
24- विनोद तावड़े
25- चन्द्रशेखर बावनकुले
26- आशीष शेलार
27- पंकजा मुंडे
28- चंद्रकांत पाटिल
29- सुधीर मुनगंटीवार
30- राधाकृष्ण विखे पाटिल
31- पीयूष गोयल
32- गिरीश महाजन
33- रवीन्द्र चव्हाण
34- के. अन्नामलाई
35- मनोज तिवारी
36- रवि किशन
37- अमर साबले
38- डॉ. विजयकुमार गावित
39- अतुल सावे
40- धनंजय महाडिक

महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान –

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला, दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे आणि पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया 20 मे ला पार पडणार आहे. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.