महाविकास आघाडी सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्या नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार मदतही दिली. या मदतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र, या राज्य सरकारचे दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे आहे.

राज्य सरजकारकडून शेतकऱ्यांची मदतीबाबत पूर्णतः फसवणूक करण्यात आलेली आहे. नुसती आश्वासने देण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याने यंदाची दिवाळी हि शेतकऱयांसाठी काळी ठरणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment