Saturday, March 25, 2023

अजित पवारांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या मुद्यांवर मांडलेल्या परखडपणाबद्दल पवारांवर निशाणा साधला. अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी व विलीनीकरणा संदर्भात परखडपणा मांडला आहे. अजित पवारांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवारांनी एसटीचे विलीनीकरण करणार नाही हे सांगण्यापेक्षा विलनिकरण का होणार नाही? ते सांगावे? दुसरीकडे आज राज्यात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे. म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत भष्ट्राचार झाला आहे. सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत.

- Advertisement -

यामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता, सीबीआय चौकशीनंतर समोर येईल. मात्र या सरकारला अजूनही गांभीर्य नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीशिवाय भयानक झालं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीबाबत पाटील म्हणाले की, अटलजींची जयंती आहे दीड लाख घरापर्यंत जाणार आहेत. मोदींच्या योजना प्रत्येक घरात सांगणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली आहे.