मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही; चंद्रकांत पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, नांदेड या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात असताना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली. “या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसून आरक्षण प्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसते. या सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे मराठी संघटनांनी स्वतःहून ताकद उभी केळीशिवाय आरक्षण मिळणार नाही. हे सरकार स्वतःहून काही आरक्षण देणार नाही,” अशी टीका पाटील यांनी केली.

त्रिपुरात कोणतीही मस्जित पाडली गेलेली नाही. उलट दुसरीकडची जगामधील मस्जित पडली गेल्याचा काहीतरी व्हिडीओ मालेगावला व्हायरल झाला. यातून अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली. त्यातून अनेक लोक जखमी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढलेल्या मोर्चातील लोकांवर गुन्हे दाखल केले. या हतनांच्या निषेधार्थ आम्ही राज्य सरकारला निवेदन दिले आहे. या गणांची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

कोल्हापुरात आज भाजपच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकावर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून निशाणा साधला आहे.

Leave a Comment