महाविकास आघाडी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. यानंतर आज तिसऱ्या दिवशी पार पडणाऱ्या अधिवेशनात पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा विरोधकांकडून आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इशारा “पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विधिमंडळाचे जे पार पडत असलेले अधिवेशन कमी वेळात उरकणे हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही निर्णय घेणार आहोत.

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment